रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील महिलेला पैशाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा पकार समोर आला आह़े ही घटना 18 जुलै 2024 रोजी घडल़ी आपली फसवणूक झाल्यापकरणी या महिलेने रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
पियुष यादव व मिनाक्षी गानोस्कर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी यांनी तकारदार महिलेच्या मोबाईलवर लिंक पाठवून एक टास्क करण्यास दिल़ी ही टास्क पूर्ण केल्यास आपल्याला जास्तिचा परतावा देण्यात येईल असे आमिष दाखविण्यात आल़े त्यानुसार या महिलेने संशयित आरोपी यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर 1 लाख 3 हजार रुपये जमा केल़े.
महिलेने भरलेल्या पैशापैकी केवळ 3 हजार रुपये आरोपी यांच्याकडून परत करण्यात आल़े तर उर्वरित 1 लाख रुपये परत न करुन आपली फसवणूक करण्यात आल़ी अशी तकार या महिलेने रत्नागिरी शहर पोलिसांत दिल़ी यापकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 398(4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 2000 चे कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केल़ा