लोणावळा : लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी शनिवारी रात्री खंडाळय़ात सुरू असलेला एका मटक्मयाचा डाव उधळून लावला. या छाप्यात 1 लाख 38 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पाच जणांविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात आली आहे.
रितेश शाम दळवी (वय 27, रा खंडाळा बाजारपेठ), सुरेश मानकर (वय 62, रा कुणेनामा ता मावळ), युसुफ तय्यबअली शेठीया (रा समरहिल, कुणेनामाता मावळ), मुनीर अब्दुला रहेमान बागवान (वय 52, रा हनुमानटेकडी, लोणावळा), लतीकेश शाम दळवी (वय 23, रा खंडाळा बाजारपेठ) यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खंडाळा गावच्या हद्दीतील तळयाच्या शेजारी एका बाकडय़ावर बसून काही लोक बेकायदेशीरपणे मोबाईलचा वापर करून कल्याण मटका जुगार खेळत आहेत. ही खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी लगेच पथकाला छापा टाकण्याच्या सूचना दिल्या. सर्वजण खासगी गाडीने घटनास्थळी पोहचले. तेथे गाडी उभी करून ते लपत छपत त्या ठिकाणी गेले असता तेथे पाच इसम बसलेले दिसले. त्याठिकाणी ते हातामध्ये मोबाईल घेऊन चिठ्ठीवर आकडेमोड करीत होते. दरम्यान त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांना जागीच पकडून त्यांची चौकशी करीत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि 20 हजार 790 रुपयांची रोकड जप्त केली. पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल करत आहेत.









