आई- वडिलांना कल्याण येथून सांगलीमध्ये (Sangli) आणण्यासाठी ऑनलाइन कॅब बुक (online cab booking) करण्याच्या प्रक्रिये दरम्यान तब्बल सव्वा लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मयूर निकम यांनी याबाबतची तक्रार दाखल केला आहे. निकम यांचे आई- वडील हे कल्याण येथून सांगलीकडे येणार होते, त्यांना येण्यासाठी निकम यांनी सांगलीतून मोबाईलवरून ऑनलाइन कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला.
त्यानंतर निकम यांना अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने याबाबतची विचारणा केली यातून कॅब बुकिंगसाठी ऑनलाईन लिंक शेअर केली. निकम यांनी ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्ड वरून तब्बल सव्वा लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत.
Previous Articleम.ए.युवा समितीचा आदर्श शाळा पुरस्कार समारंभ शनिवारी
Next Article MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट








