एपीएमसीच्या बुधवारच्या बाजारात साठवून ठेवलेला महाराष्ट्र-कर्नाटक कांदा आवक सुरू
वार्ताहर /अगसगे
एपीएमसी मार्केट यार्डमध्ये बुधवारच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटलला 300 रुपयांनी वाढला आहे. बेळगाव जवारी बटाटा भाव मात्र स्थिर आहे. गेल्या दोन महिन्यापासून कांदा भाव क्विंटलला 1500 ते 2500 रुपये होता. साठवून ठेवलेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जुन्या कांद्याची आवक मार्केट यार्डमध्ये होत आहे. पुढील महिन्यापासून कर्नाटकातील नवीन कांदा उत्पादन काढणीला प्रारंभ होणार असून आवक येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये काही परिसरामध्ये कांद्याची लागवड केली असून जानेवारीमध्ये महाराष्ट्र कांदा मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी दाखल होतो.
कांदा आवकेत घट
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जुन्या कांद्याची आवक सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे विविध बाजारपेठेमध्ये आवकेत घट निर्माण होत आहे. याचा परिणाम कांद्याच्या दरात होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा दर वाढला आहे आणि विदेशामध्ये भारतातून कांदा निर्यात होत आहे. केंद्र सरकार कांदा निर्यातीवर 40 टक्के कर आकारत आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे कांदा उत्पादनात घट निर्माण होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे. शनिवार दि. 23 रोजी बाजारात कांदा भाव 1000 ते 2600 रुपये झाला होता. बुधवारच्या बाजारात कांदा भाव क्विंटलला 1500 ते 3200 रुपये झाला आहे. तर शनिवारच्या बाजारात कांदा भाव काय होणार, याकडे व्यापारी व खरेदीदारांमध्ये चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशचे खरेदीदार बेळगावात
जवारी बटाटा आवक सुमारे पाच हजार पिशव्या विक्रीसाठी दाखल झाली होती. जवारी बटाटा सध्या लाल व जमिनीमध्ये काढणी सुरू आहे. उत्तर प्रदेशचे खरेदीदार बेळगावात दाखल झाले असून जवारी बटाटा लिलावामध्ये खरेदी करून उत्तर प्रदेशला पाठवत आहेत तर रताळी आवक सुमारे सातशे पिशव्या आवक झाली असून दिल्लीला 1 ट्रक रताळी पाठवण्यात आली आहे.
कांदा भाव प्रति क्विंटल
- गोळा 1500 ते 2000 रु.
- मिडियम 2400 ते 2800 रु.
- मोठवड 2800 ते 3000 रु.
- गोळा 3100 ते 3200 रु.
जवारी बटाटा भाव
- गोळा 400 ते 600 रु.
- मिडियम 1200 ते 1600 रु.
- मोठवड 1900 ते 2100 रु.
- बटाटा गोवा क्वॉलिटी 2300 ते 2400 रु.
- साधी रताळी 1800 ते 2200 रु.
- मलकापुरी रताळी 2500 ते 3000 रु.
इंदूर बटाटा भाव
- मिडियम 1400 ते 1600 रु.
- मोठवड 1800 ते 2000 रु.
- गोळा 2050 ते 2150 रु.
आग्रा बटाटा भाव
- मिडियम 1000 ते 1200 रु.
- मोठवड 1400 ते 1600 रु.
- गोळा 1650 ते 1800 रु.









