कमी उत्पादनामुळे नफा 34 टक्क्यांनी झाला कमी
नवी दिल्ली :
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तेल उत्पादन क्षेत्रातील कंपनी ओएनजीसीचा निव्वळ नफा 10,015 कोटी रुपयांवर घसरला आहे. कंपनीने सांगितले की, जूनच्या तिमाहीत निव्वळ नफा 10,015 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 15,206 कोटी रुपये राहिला होता. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे भारतातील सर्वात मोठे उत्पादक ओएनजीसीने गेल्या वर्षी कच्च्या तेलावर प्रति बॅरल 76.49 डॉलर कमावले, जे मागील वर्षी याच तिमाहीत 108.55 डॉलर प्रति बॅरल होते.
2022 च्या तिमाहीत जगभरात तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुरवठा आणि मागणी अनिश्चिततेच्या दरम्यान जून 2022 च्या तिमाहीत जागतिक स्तरावर तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. सदरच्या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 20 टक्क्यांनी घसरून 33,814 कोटी रुपयांवर आला आहे. ओएनजीसीने सांगितले की, कच्च्या तेलाचे उत्पादन 3.2 टक्क्यांनी घसरून 4.6 दशलक्ष टन झाले, तर वायू उत्पादन 3.3 टक्क्यांनी घसरून 5.04 अब्ज घनमीटर झाले आहे.









