29,999 रुपये सुरुवातीची किंमत : स्मार्टफोनला 50 एमपी कॅमेऱ्याची सुविधा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टेक कंपनी वनप्लसचा ‘वनप्लस समर लाँच इव्हेंट’ इटलीच्या मिलान शहरात झाला यामध्ये कंपनीने आपला वनप्लस नॉर्ड 4 हा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 50 मेगापिक्सल ओआयएस कॅमेरासह येणार असून यात ओल्ड स्क्रीन अणि 100 डब्लू फास्ट चार्जिंगसह 5500 एमएएच बॅटरी मिळणार आहे. कंपनीची नॉर्ड आवृत्तीतील सर्वात मजबूत व शक्तीशाली स्मार्टफोन राहणार आहे. कंपनीने फोन तीन प्रकारात सादर केला आहे. वनप्लसची सुरुवातीची किंमत ही 29,999 रुपये राहणार आहे. यासह अन्य अत्याधुनिक सुविधांचेही फिचर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.









