नवी दिल्ली
केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना 22 ऑगस्ट 2024 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशावरून शुक्रवारी यासंबंधी माहिती देण्यात आली. या पदावरील त्यांची ही चौथी मुदतवाढ आहे. भल्ला यांच्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यापूर्वी पॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना 30 ऑगस्ट 2023 नंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. गौबा यांचा हा तिसरा सेवाविस्तार आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भल्ला यांच्या सेवेला 22 ऑगस्ट 2023 नंतर एक वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच 22 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. नवीनतम सेवा विस्तारासह भल्ला पुढीलवर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत पदावर राहतील. आसाम-मेघालय केडरचे 1984 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी भल्ला यांची ऑगस्ट 2019 मध्ये गृह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते नोव्हेंबर 2020 मध्ये वयाच्या 60 व्या वषी निवृत्त होणार होते. त्यांचा कार्यकाळ प्रथम 17 ऑक्टोबर 2020 रोजी 22 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचा कार्यकाळ 2021 आणि 2022 मध्ये प्रत्येकी एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता. गृह मंत्रालयात ऊजू होण्यापूर्वी भल्ला यांनी ऊर्जा सचिव आणि विदेश व्यापार महासंचालक या पदांवर काम केले. त्यांनी आसाम आणि मेघालय या त्यांच्या संवर्गातील राज्यांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.









