वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मंत्रिमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गौबा यांना मोदी सरकारमध्ये एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. या निर्णयामुळे 2024 च्या निवडणुकीपर्यंत ते या पदावर राहणार आहेत. नोकरशहांमध्ये मंत्रिमंडळ सचिव हे पद सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मंत्रिमंडळ सचिव हे पंतप्रधान आणि मंत्री यांच्यात समन्वय प्रस्थापित करण्याचे काम करतात. मोदी सरकारने 2019 मध्ये राजीव गौबा यांना भारताचे मंत्रिमंडळ सचिव बनवले होते. त्यानंतर त्यांना दोनवेळा या पदावर मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ते गृहसचिव पदावरही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता.









