Pandharpur news : आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात १ टन द्राक्षाची सजावट केली होती. मात्र ही सजावट अर्धा तासात गायब झाल्याने परिसरासह सोशल मिडियावर चर्चेला उधान आले आहे. तसेच ही द्राक्ष कशी गायब झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाविकासह द्राक्ष देणाऱ्या भाविकाने केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, एकादशीनिमित्त पंढपुरात विठ्ठल मंदिरात १ टन द्राक्षांची सजावट करण्यासाठी पुण्यातील बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पूनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी दिली होती. त्यानुसार १ टन द्राक्षांचे मन्यांनी मंदिराचा गाभारा सजवला होता. मात्र केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाली.आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु झाले आणि अर्ध्या तासात द्राक्षाचा एकही मनी शिल्लक राहिला नाही.दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोणी पळवले याची चर्चा सुरु या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचा शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी मागणी विट्ठल भक्तांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








