पावसात पार्क केलेल्या डीओ, एक्टीवा, स्प्लेंन्डर लांबविणाऱ्या चोरट्याच्या फोंडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या
फोंडा : संततधार पावसात पार्क करून ठेवलेल्या दुचाकी लांबविणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. फोंडा पोलिसांनी सुमारे 2 लाख रूपये किमतीच्या एकूण तीन दुचाकी लांबविल्याप्रकरणी एका संशयिताला काल रविवारी अटक केली आहे. अनिकेत अॅथनी परेरा (19, मूळ कुंडई, रा. कुडतरी) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने गावणे फोंडा येथून 26 जून रोजी एक दुचाकी तर इतर ठिकाणाहून दोन दुचाकी लांबविल्या होत्या. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावणे बांदोडा येथील रामचंद्र नाईक यांने आपली एक्टीवा जीए 05 एन 1143 स्कूटर लांबविल्याची तक्रार 13 जुलै रोजी फोंडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्dयानंतर फोंडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती. दुचाकीचा नंबर बदलून फोंड्यात संशयास्पदरित्या फिरत असताना संशयिताला पोलिसांनी पकडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. तपासाअंती अन्य दोन दुचाकी लांबविण्यातही संशयिताने आपला सहभाग असल्याची कबूली दिल्यानंतर डीओ स्कूटर व स्प्लेन्डर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तूषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार केदारनाथ जल्मी, देवीदास पर्येकर, कॉन्स्टेबल आदित्य नाईक, अमेय गोसावी यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भा.दं. सं. 379 कलमाखाली गुन्हा नेंदवून 3 दिवसाच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.









