बांदा- दाणोली जिल्हा मार्गावरील महत्वाचा पुल
ओटवणे प्रतिनिधी
गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बांदा – दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथील नदिवर यावर्षी बांधण्यात आलेल्या पुलाचा एका बाजूचा जोडरस्ता खचला. संबंधित खात्याने याची तात्काळ दखल घेऊन हा खचलेला हा जोडरस्ता तात्काळ पूर्ववत करावा अशी मागणी या भागातील वाहन चालकांसह ग्रामस्थांमधून होत आहे.
अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे पूल बांधण्यात आले आहे. अनेक समस्यांना तोंड देत या मोठ्या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने अवघ्या सहा महिन्यात पूर्ण केले. पुलाच्या जोड रस्त्याचे तात्पुरते काम तात्काळ करीत हा पूल यावर्षीच वाहतुकीस खुला केला. पावसाळ्यानंतर या पुलाच्या जोड रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
मात्र अतीवृष्टीमुळे या पुलाच्या एका बाजूचा जोडरस्ता खचला. संबंधित खात्याने याची तात्काळ दखल घेऊन वाहतूक सुरळीत करावी तसेच नेहमी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने जोड रस्त्यावर सूचना फलक लावावेत अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.









