नवी दिल्ली :
वन प्लस कंपनीचा वन प्लस 12 व 12 आर हे दोन स्मार्टफोन्स भारतात पुढील वर्षी दाखल होणार असून त्यासंबंधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सदरचा स्मार्टफोन 23 जानेवारी 2024 रोजी भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मिळते आहे. वन प्लस 12 हा स्मार्टफोन 5 डिसेंबरला चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. वन प्लस 12 हा 6.82 इंचाच्या एलटीपीओ सुपर फ्ल्युड अमोलेड डिस्प्लेसह येणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जन 3 चिपसह सादर होईल. याला ट्रीपल कॅमेऱ्याची सोय असणार असून 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल तर अन्य 64 मेगापिक्सल व 48 मेगापिक्सलचे कॅमेरे असतील.









