बेळगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने सुळेभावी (ता. बेळगाव) येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला. बुधवारी दुपारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील के. के. कोप्प क्रॉसजवळ ही घटना घडली आहे. रामू नारायण बंगोडी (वय 54, रा. सुळेभावी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवीचे नाव आहे. रामू हे दुचाकीच्या पाठीमागील सीटवर बसले होते. दुचाकी चालविणारे गोपाल बसाप्पा ताळुकर (वय 58, रा. देवांगनगर-वडगाव) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. बुधवारी दुपारी गोपाल हे आपले नातेवाईक असणारे रामू बंगोडी व 10 वर्षांची मुलगी साक्षी हिला घेऊन दुचाकीवरून हिरेबागेवाडीहून बेळगावकडे येत होते. के. के. कोप्प क्रॉसजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने गोपाल यांच्या हाताला दुखापत झाली. तिघेही दुचाकीवरून खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या रामू यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने आपल्या वाहनासह पलायन केले आहे. बुधवारी दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघातानंतर वाहनासह पलायन करणाऱ्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.
Previous Articleहलगा-मच्छे बायपास खटला पुन्हा पुढे ढकलला
Next Article पॅसेंजरच्या डब्यात तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









