कोल्हापूर :
दोन आठवड्यापूर्वी उघडकीस आलेल्या बेकायदेशिर गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी पोलिसांनी आणखीन एक जणास अटक केली. निकेश कुशल राज बोहरा उर्फ राजेश ड्रग्स (रा. बेंगलोर) असे त्याचे नाव आहे. त्याने या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणातील अटकेतील संशयितांना गर्भपाताच्या गोळ्या पुरविल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बुधवारी अटक केली. त्यामुळे या प्रकरणाचे कनेक्शन कोल्हापूर ते बेंगलोर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कळंबा (ता. करवीर) येथील श्रध्दा या खासगी हॉस्पिटलच्या बीएचएमएस महिला डॉ. दिपाली सुभाष ताईगडे (वय 46, रा. साई मंदिरसमोर, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हिने आपल्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करीत होत्या. तर सुप्रिया संतोष माने (वय 42, रा. रायगड कॉलनी, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर), धनश्री अऊण भोसले (वय 30, रा. शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या दोन महिला घरपोहोच गर्भपाताचे औषधे देत असताना दोन आठवड्यापूर्वी अटक केली आहे. या तिघीना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
याचदरम्यान या महिलांना गर्भपाताची औषधे शहरातील एक मेडिकल दुकानदार पुरवित असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यावऊन काही दिवसापूर्वी त्या संबंधित मेडिकल दुकानदाराला अटक केली आहे. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी सुऊ केली. त्याच्या चौकशीत निकेश कुशल राज बोहरा उर्फ राजेश ड्रग्ज (रा. बेंगलोर) यांने गर्भपाताच्या औषधाचा पुरवठा केल्याची केल्याची माहिती उघड झाली. त्यावऊन करवीर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन, त्याला बुधवारी अटक केली.








