मुडलगी येथील घटना, आरोपीला अटक
बेळगाव : जमिनीच्या वादातून एकाचा विळ्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 30 रोजी पुलग•ाr, ता. मुडलगी येथे घडली आहे. रामप्पा बसाप्पा कौजलगी (वय 24, रा. पुलग•ाr ता. मुडलगी) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मुडलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी सिद्धाप्पा मल्लाप्पा कौजलगी (वय 25, रा. पुलग•ाr ता. मुडलगी) याला अटक केली आहे. आरोपी सिद्धाप्पा याने रामप्पा याच्या मोठ्या काकाची जमीन कसण्यासाठी घेतली होती. त्यामुळे आमच्या काकाची जमीन कशाला कसत आहेस, असे म्हणत रामप्पा त्याला सतावत होता. याच कारणातून सोमवारी दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात सिद्धाप्पाने रामप्पावर विळ्याने वार केल्याने तो ठार झाला. घटनेची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती व मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.









