शिरोळ प्रतिनिधी
इंडिका चारचाकी गाडीचे पंक्चर काढीत असताना भरधाव डंपर वाहनाने धडक दिल्याने अर्जुनवाड( ता शिरोळ) येथील एकजण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला आहे . गोरखनाथ आण्णासो गायकवाड ( वय 48 रा. घालवाड रोड देसाई मळा अर्जुनवाड ) असे मयताचे नाव आहे . ही घटना सोमवारी रात्री 8 वाजता शिरोळ जयसिंगपूर बायपास रोडवरील न्यु डायमंड हॉटेल समोर घडली . या बाबत शिरोळ पोलीसात विशाल गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे .
याबाबत शिरोळ पोलीसा कड्न मिळलेली माहिती अशी की, अर्जुनवाड येथील गोरखनाथ गायकवाड व त्यांचे नातेवाईक हे इंडिका चारचाकी गाडी घेवून कोल्हापूरहुन शिरोळकडे येत होते. दरम्यान च्या प्रवासात न्यु डायमंड हॉटेल समोर चारचाकी गाडी पंक्चर झाल्याने चालक सावंत व अन्य गायकवाड हे इंडिका गाडीचे चाक बदलत असताना चौडेश्वरी फाट्या कडून ग्रिट भरुन भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने समोरील बाजुने इंडीकाला जोरदार धडक दिल्याने चालक सावंत गंभीर जखमी झाला तर गोरखनाथ गायकवाड यांच्या अंगावरून डंपरचे चाक अंगावर गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला. त्यामुळे संबधीत अज्ञात डंपर चालकाविरुद्ध शिरोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी डंपर वाहनासह चालकाला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसानी सागितले.









