सांगली :
सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकलीजवळ सुयोग हॉटेलजवळ एकाने रस्त्याचा अंदाज न घेता हयगयीने दुचाकी चालविल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृत प्रदीप नरसगोंडा पाटील (वय 49 रा. जयसिंगपूर) याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,प्रदीप पाटील हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संरक्षक प्लेटला धडकून रस्त्यावर आपटले. त्यामध्ये त्यांच्या डोक्यास आणि इतर ठिकाणी मार लागून ते मयत झाले. त्यामुळे त्याच्याविरूध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








