वार्ताहर / जमखंडी
रुग्णवाहिका व दुचाकीची समोरासमोर टक्कर झाल्याने दुचाकीस्वार ठार तर मागे बसलेला गंभीर जखमी झाल्याची घटना जमखंडी-मुधोळ मार्गावर घडली. सोहेल पठाण (वय 22) असे मृताचे नाव आहे.
सोहेल दुचाकीवरून आपल्या मित्रासह काही कामानिमित्त मुधोळला जात होता. अचानक समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला दुचाकीची समोरून जोराची धडक बसली. त्यात सोहेल जागीच गतप्राण झाला तर मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद जमखंडी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पीएसआय महेश संक अधिक तपास करत आहेत.









