पणजी/ प्रतिनिधी
डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली दुसऱयांदा सत्तेवर आलेल्या सरकारचे शंभर दिवस उद्या 6 जुलै रोजी पूर्ण होणार आहेत. यानिमित्त सरकारी पातळीवर एक छोटा कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयातर्फे देखील कार्यक्रम सादर केला जाणार आहे. दरम्यान त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक सकाळी बोलावली आहे.









