रत्नागिरी :
फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिह्यात 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांची प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्हा परिषदेचे 62 गट तर 124 पंचायत समिती गणांची रचना करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी जाहीर केलेल्या प्रारुप गटांची संख्या 6 ने तर पंचायत समिती गणांची संख्या 12 ने कमी झाली आहे. आता जिल्हा परिषदेचे 56 गट तर पंचायत समितीच्या 112 गणांसाठी निवडणूक होणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता पावले उचलण्यास सुऊवात केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राऊप गट व गण प्रभागरचना जाहीर केली आहे. 14 जुलै रोजी राज्य शासनाकडून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्राऊप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. या आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील फलकावर, तसेच मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तहसीलदारांच्या कार्यालयातील फलकावर लावण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर सूचना हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 21 जुलै आहे.
- तालुकानिहाय जिल्हा परिषद गट
मंडणगड – भिंगळोली, बाणकोट
दापोली – केळशी, पालगड, हर्णै, जालगाव, कोळबांद्रे, दाभोळ
खेड – सुकिवली, भरणे, भडगाव, दयाळ, बिराचीवाडी, लोटे, धामणदेवी
चिपळूण – कळवंडे, पेढे, खेर्डी, अलोरे, शिरगाव, सावर्डे, उमरोली, वहाळ, कोकरे
गुहागर – असगोली, शृंगारतळी, कोंडकारुळ, वेळणेश्वर, पडवे
रत्नागिरी – वाटद, खालगाव, कोतवडे, झाडगाव (न. प. हद्दीबाहेर), खेडशी, हातखंबा, नाचणे, कर्ला, पावस, गोळप
संगमेश्वर – कडवई, कसबा, मुचरी, कोसुंब, साडवली, दाभोळे, धामापूर तर्फे संगमेश्वर
लांजा – आसगे, भांबेड, साटवली, गवाणे
राजापूर – वडदहसोळ, तळवडे, जुवाठी, धोपेश्वर, साखरीनाटे, कातळी
- पंचायत समिती गण तालुकानिहाय
मंडणगड – इस्लामपूर, भिंगळोली, बाणकोट, तुळशी.
दापोली – केळशी, जुईकर मोहल्ला, पालगड, खेर्डी, गिम्हवणे, हर्णे, जालगाव,
टेटवली, कोळबांद्रे, पांगरी तर्फे हवेली, बुरोंडी, दाभोळ.
खेड – सुकिवली, तिसंगी, खवटी, भरणे, भडगाव, जामगे, दयाळ, बहिरवली, गुणदे,
बिराचीवाडी, लोटे, आंबडस, आंजणी, धामणदेवी
चिपळूण- भोम, कळवंडे, पेढे, दळवटणे, खेर्डी, कापसाळ, अलोरे, पिंपळीखुर्द, वेहेळे,
शिरगाव, सावर्डे, मांडकी, उमरोली, गुढे, निवळी, वहाळ, कोकरे, कुटरे
गुहागर – अंजनवेल, असगोली, तळवली, शृंगारतळी, मळण, कोंडकाऊळ, शिर, पडवे, पाचेरी सडा, वेळणेश्वर
रत्नागिरी- वाटद, कळझोडी, खालगाव, करबुडे, नेवरे, कोतवडे, साखरतर, झाडगाव,
खेडशी, केळ्ये, हातखंबा, नाणीज, कुवारबाव, नाचणे, कर्ला, हरचेरी, भाट्यो, गोळप, पावस, गावखडी.
संगमेश्वर – धामापूर, आरवली, कडवई, धामण, कसबा, परचुरी, माभळे, मुचरी, कोसुंब, निवे (बुद्रुक), साडवली, हातीव, दाभोळ, केंडगाव
लांजा – आसगे, वेरवली (खुर्द), प्रभानवल्ली, भांबेड, वाकेड, साटवली, गवाणे ,खानवली
राजापूर – वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी








