अमेरिकेच्या सीडीसी अहवालाचा निष्कर्ष
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या 2021 च्या एका अहवालानुसार जगातील प्रत्येक पाचव्या मुलात एंक्झाइटीची लक्षणे दिसून येत आहेत. चिंतेची बाब म्हणजे पालक या गोष्टीला सामान्य मानत असून हा प्रकार नुकसानदायी आहे. एंक्झाइटीच्या समस्येमुळे भविष्यात मुलांना मानसिक समस्येला तोंड द्यावे लागू शकते. पीडित मुले लोकांना भेटणे, मित्रांसोबत हिंडणे-फिरणे टाळू लागतात.
अनेक मुलांमध्ये गर्दीत जाण्याच्या नावावर पोटदुखी, वारंवार लघवी होणे, डोकेदुखी इत्यादी तक्रारी दिसून येतात. न्यूयॉर्कच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट रेचल बुसमॅन यांच्यानुसार या लक्षणांना जितक्या लवकर ओळखले जाईल, मुलांना तितकेच या समस्येपासून वाचविणे सोपे ठरत असते.

जनरल एंक्झाइटी
या प्रकारच्या एंक्झाइटीमध्ये मुले प्रतिदिनच्या कामांनाही करण्यास नकार देऊ लागतात. युक्रेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार मुलांकडे समस्या सांगण्याचे साधन नसल्याने ते अशाप्रकारे व्यक्त होत असतात. यात एकाग्रतेचा अभाव, बिछाना ओला करणे, झोप न लागणे, खाण्यास टाळाटाळ करणे, नेहमी पालकांना चिकटून राहणे, दैनंदिन कामे करतानाही त्रास होते, लोकांमध्ये बोलण्यास घाबरणे अशाप्रकारची लक्षणे दिसून येतात.
सोशल एंक्झाइटी
अशाप्रकारच्या एंक्झाइटीमध्ये लोकांदरम्यान बोलण्यास भीती वाटू लागते, अत्यंत लहान आवाजात बोलले जाते. वॉशिंग्टन येथील चिल्ड्रन नॅशनल हॉस्पिटलनुसार सोशल एंक्झाटीने पीडित मुले अशाप्रकारे व्यक्त होत असतात. शाळेत जाण्यास अन् लोकांमध्ये बोलण्यास नकार देणे किंवा लहान आवाजात बोलणे, डोळे खाली करून चेहरा न पाहता बोलणे, लोकांमध्ये राहणे, लोकांसमोर जेवण, वर्गात बोलण्यास घाबरणे अशी लक्षणे यात दिसून येत असतात.
विचारपूस करा
मुलाला त्रास देणारी स्थिती दूर करण्याऐवजी त्याला सामोरे जाण्यासाठी तयार करा. गरज भासल्यास मनोचिकित्सक किंवा बालरोगतज्ञाचा सल्ला घेतला जावा असे सीडीसीच्या अहवालात म्हटले गेले आहे.









