ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या येरवडा परिसरात PMPML बसखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाला. सादल बाबा चौकाजवळ रात्री साडेसातच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, PMPML ची मार्ग क्र. 148 (एमएच-14 एचयु -5044) ही बस रात्री साडेसातच्या सुमारास येरवडय़ाकडून चंद्रमा चौकाच्या दिशेने जात होती. सादल बाबा चौकाजवळच्या रेड्डी हॉटेल समोर ही बस आली असता अचानक बसच्या मागील चाकाखाली एक व्यक्ती आला. बसचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अधिक वाचा : चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित
शहरातील अरुंद रस्ता, गर्दीच्या मुख्य चौकांमध्ये असलेली हॉटेल्स, वाईन शॉप आणि वाहनांची बेशिस्त पार्किंग यामुळे या ठिकाणी अनेकदा लहान मोठे अपघात झाले आहे. पीएमपीएमएलचे चालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. गर्दीच्या ठिकाणीही बसचा वेग कमी नसतो. त्यामुळे बसचालकांविरोधातही नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.