परुळे प्रतिनिधी
परुळे तराळी येथे विहीर खोदाई करून त्याला लाखडी सांगाडा बसवत असताना, विहिरीच्या भागाची दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्याने खाली काम करणारे वसंत उर्फ अनिल विनायक केसरकर, (४०) कुशेवाडा केसरकरवाडी दरडी खाली गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. यादरम्यान काम करणारे ५ कामगार बचावले तर लक्ष्मण गगाराम कुंभार व सिध्देश आनंद हादगे, राहणार परुळे हे किकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता घडली नेहमीप्रमाणे सकाळी ८.३० वाजता कामासाठी सुरुवात करण्यात आली व कामगार लाकडी सांगाडा विहिरीत बसवत होते. पण शेवटचे दोन ते तीन लाकडी तुकडे बसवून जेवणासाठी विहिरीतून बाहेर पडताना १२.३० च्या सुमारास विहिरीच्या बाजूची मोठी दरड विहिरीत कोसळली या दरम्यान वसंत केसरकर या दरडीखाली दबले गेले. तात्काळ बाजूलाच डंपर मध्ये माती भरत असलेला पोकलँड घटनास्थळी आला व ही दरड हटवून केसरकर यांना बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी परुळे यांना आजारवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी घटनास्थळीच सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. केसरकर यांच्या पश्चात दोन लहान मुले अल्पवयाची आहेत.