वृत्तसंस्था/ आयडाहो
अमेरिकेतील आयडाहो येथील गोठलेल्या तलावावर गुरुवारी हेलिकॉप्टर कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. घटनेची माहिती समजल्यानंतर बचाव पथक स्नोमोबाईल वापरून अपघातस्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेमागील नेमके कारण तपासले जात आहे. दुर्घटनेसंबंधी फेडरल एव्हिएशन असोसिएशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डला अधिक माहिती मिळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर परिसरात एक वीज तार तुटलेली आढळली असून अपघाताची चौकशी सुरू आहे.









