प्रतिनिधी/ बेळगाव
आजच्या स्पर्धेच्या युगात जिंकणे किंवा हरणे यापेक्षा आपला सहभाग महत्त्वाचा आहे. सहभागामुळे शिकण्याची आणि आत्मविश्वास वाढीची भावना आत्मसात होते. अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे, असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या डॉ. नागरत्न परांडे यांनी व्यक्त केले.
कर्नाटक लिंगायत सोसायटीच्या लिंगराज स्वायत्त महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय स्तरावर आयोजित साहित्य महोत्सवात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी होते. व्यासपीठावर डॉ. शशिकांत कोण्णूर, प्रा. सारिका नगरे, प्रा. मनाली देसाई उपस्थित होते.
यावेळी 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी साहित्यिक महोत्सवात सहभाग दर्शविला. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन तसनीम पिरजादे यांनी केले. प्रा. सी. एस. पाटील यांनी आभार मानले.









