वृत्तसंस्था/ भोपाळ
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेल्या राज्यातील खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये व सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे.
ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये भारतीयांनी मोठी प्रगती केल्याचे दिसून येत आहे. पॅरालिम्पिकमध्ये राज्यातील तीन खेळाडूंनी यश मिळविले. याआधी आम्ही ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांना एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती, आता पॅरालिम्पिकमधील पदकविजेत्यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये व सरकारी नोकरी देण्याची घोषणा करीत आहोत, असे मुख्यमंत्री मोहन याद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पूजा ओझा, प्राची यादव, कपिल परमार या मध्यप्रदेशच्या तीन खेळाडूंने पदके जिंकली असून त्यांचा सरकारतर्फे सत्कार करण्यात आली.









