खाणींविरोधात तक्रार केल्याने मारहाण. विश्वास मोरजकर यांच्या डोक्मयाला मार. पोलीस तक्रार दाखल.
डिचोली : नार्वे येथे पठारावर सुरू असलेल्या चिरे खाणींच्या विरोधात तक्रार केल्याने संबंधित खाणवाल्यांनी मारहाण केल्याचा दावा हातुर्ली मये येथील विश्वास मोरजकर यां?नी केला आहे. या संबंधी रात्री डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याचेही मोरजकर यांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार काल शुक्र. दि. 12 जाने. रोजी सदर घटना घडली. आपण हातुर्ली मये येथील आपल्या घरी भावासह बसून बोलत असताना आपल्या घराबाहेर सुमारे दहाजण खाणवाले आले. त्यांनी काहीतरी बोलायचे आहे, असे सांगून आपणास बाहेर बोलावले. त्यापैकी एकाने आपल्या डोक्मयावर थेट दंडुक्मयाने वार केला. त्यामुळे आपल्या डोक्मयाला जबर मार लागल्याचेही विश्वास मोरजकर यांनी सांगितले.
नार्वे भागात ज्याठिकाणी चिरेखाणी चालतात त्याठिकाणी आमची मालमत्ता आहे. त्यात आमच्या काजू बागायती असल्याने तेथे पूर्णपणे प्रदुषण केले आहे. तसेच खासगी सर्व्ह?यर आणून जमीन मापून घेतली असता आमच्या सर्व्ह? जमीनीत तीन खाणी अतिक्रमण करून सुरू असल्याचे आम्हाला निदर्शनास आले. त्यावरून आम्ही गेल्या 8 डिसें. रोजी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार सादर केली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अशी माहिती विश्वास मोरजकर यांनी दिली. याच प्रकरणावरून त्यांनी आपणास मारहाण केली आहे. आपल्या घरी आलेल्या सर्वांच्या विरोधात पोलीस तक्रार सादर करणार असून पोलिसांनी व सरकारनेही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी मोरजकर यांनी केली आहे. या मारहाणीनंतर मोरजकर यांच्यावर डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या त्यांना अधिक तपासणीसाठी म्हापसा येथे सामाजिक रूग्णालयात पाठविण्यात आले होते.









