कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदार आणि दोन खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापुरात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच महाराष्ट्रभर शिवसेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे दौरा करत आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. . मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्टला संध्याकाळी येणार असल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली. आज कोल्हापुरात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निष्ठा रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला भगदाड पडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरला आले होते. यावेळी माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत दिसल्याने ते सुद्धा बंडखोरी करणार का? याची चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक एका बाजूला आणि जिल्ह्यातील सैनिकांच्या जीवावर झालेले आमदार-खासदार एका बाजूला असे सध्या एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आदित्य ठाकरे काय बोलतात? बंडखोरांवर कोणती तोफ डागतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








