पुणे / प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. खारघर येथे केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
या प्रकरणानंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांच्या लेटरहेडवर आपलं म्हणणे मांडलं होतं. त्यामध्ये त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर त्याच पत्राचा आधार घेऊन? सोशल मिडियावर सरकारच्या विरोधात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी कसे गेले आहेत. आणि भाजप आणि सेनेला मदत करू नका अशा आशयाचे बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर खरे की खोटे पत्र याबाबत प्रश्न उपस्थित होत होते.त्यानंतर रायगड पोलिसांनी याबाबत दखल घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रायगड पोलिसांनी पुण्यात येऊन कारवाई केली आहे. हे पत्र बनवून शेयर करणाऱ्या शुभम काळे या तरुणाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.









