वीज वितरणचे दीड लाखाचे नुकसान
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरासह तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडून ,तुटून व घरावर व मांगरावर झाडे पडून नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे गेले दोन दिवस वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोलगाव ,बांदा ,माडखोल, सांगेली भागात वीज वितरणचे पोल तुटून ,वायर तुटणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज वितरण ते जवळपास दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. निगुडे मधलीवाडी येथील रामदास काशिनाथ नाईक यांच्या घरावर सागाचे झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले आहे. तर आजगांव भोमवडी येथील भिकाजी पांडुरंग मालजी यांच्या मांगरावर काल रात्री माड पडून अंदाजे 60000/- चे नुकसान झाले आहे. असे जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान वादळी वाऱ्यासह पडत असल्या पावसाने सावंतवाडी तालुक्यात झाले आहे. आंबोली ,इन्सुली घाटात झाड पडले होते. ते झाड सार्वजनिक बांधकाम, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दूर केल्याने वाहतूक सुरळीत झाली . दिवसभरात तीन इंच पावसाची नोंद झाली आहे . पडत असलेल्या धुवाधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सावंतवाडी तालुक्यात भात शेती पिकली आहे . त्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . असे कृषी विभागाने स्पष्ट केले . वीज वितरण चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती उपकार्यकारी अभियंता के. एच चव्हाण यांनी दिली . तर महसूल विभागाचे 70,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले.