सर्वत्र पाणीच पाणी : पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण, सर्वात अधिक पाऊस खानापूर तालुक्यात
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी पावसाचा वेग मंदावला असताना बुधवारी पहाटेपासून मात्र मुसळधार पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर शहर परिसरातील नाले व नदीला पाणी अधिक आल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढला असून येत्या दोन दिवसांत अजूनही दमदार पाऊस कोसळेल, अशी शक्मयता व्यक्त होत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. मध्यंतरी दोन दिवस संततधार पाऊस कोसळला. त्यानंतर मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे पाऊस कमी होईल, अशी शक्मयता व्यक्त होत होती. मात्र, पुन्हा बुधवारी पहाटेपासूनच दमदार पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासांत जिल्हय़ात 13.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. बेळगाव तालुक्मयात 20.9 मि. मी. पाऊस झाला आहे. तर सर्वात जास्त खानापूर तालुक्मयात 50.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाला जोर अधिक असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणेही कठीण झाले होते. सकाळच्या सत्रामध्ये दमदार पावसामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामध्येच वाहने पुढे रेटावी लागत होती. यातच काही रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. त्यामधून वाहने चालवावी लागत होती. एकूणच या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली.
व्यापारी, भाजीविपेते यांची चांगलीच तारांबळ
शहरातील सखल भागांबरोबरच उपनगरांतदेखील पाणी साचून होते. दुपारी 12 पर्यंत पावसाला अधिक जोर होता. त्यानंतर काहीवेळ पावसाचा वेग मंदावला होता. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी, भाजीविपेते यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा बळ्ळारी नाल्याला पूर आला. याचबरोबर मार्कंडेय नदीही दुथडी भरून वाहत होती. बळ्ळारी नाल्यातील आणि नदीतील पाणी जवळच्या शिवारात जाऊन भातपीक पाण्याखाली गेले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत उपनगरांमध्ये कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. याचबरोबर खोदाई करून ठेवण्यात आलेल्या रस्त्यांवर पाणी साचून होते. आनंदनगर, वडगाव-येळ्ळूर मुख्य रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामधून वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे होत आहे.
बसवेश्वर सर्कलजवळ गुडघाभर पाणी
बसवेश्वर सर्कलजवळ असलेल्या रहदारी सिग्नलजवळच पाणी साचून आहे. बसवेश्वर सर्कलजवळ असलेल्या बसथांब्याजवळ मोठा सखल भाग झाला आहे. त्याठिकाणी गुडघाभर पाणी साचून आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा या पावसामुळे उघडा पाडविला आहे.
ग्रामीण भागातही दमदार पाऊस
शहराबरोबरच ग्रामीण भागातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. काही सखल भागाला फटका बसला तरी इतर शेतकऱयांना मात्र दमदार पावसाची गरज होती. सध्या भातलावणीचे काम सुरू असून त्या शेतकऱयांना पावसाची नितांत गरज होती. त्यांना या पावसाचा मोठा फायदा झाला आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत झालेला पाऊस…
तालुका | झालेला पाऊस |
अथणी | 6.8 मि. मी. |
बैलहोंगल | 7.7 मि. मी. |
बेळगाव | 20.9 मि. मी. |
चिक्कोडी | 9.7 मि. मी. |
गोकाक | 3.1 मि. मी. |
हुक्केरी | 7.6 मि. मी. |
खानापूर | 50.4 मि. मी. |
रामदुर्ग | 2.3 मि. मी. |
रायबाग | 10.6 मि. मी. |
सौंदत्ती | 3.7 मि. मी. |
कित्तूर | 14.5 मि. मी. |
निपाणी | 18.7 मि. मी. |
कागवाड | 4.7 मि. मी. |
मुडलगी | 4.5 मि. मी. |
एकूण सरासरी | 13.4 मि. मी. |