सावंतवाडी / प्रतिनिधी
श्री सिद्ध महापुरुष सेवा मंडळ कारिवडे गोसावीवाडी या मंडळाच्या वतीने 19 मे 2023 रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सिद्ध महापुरुष हे जागृत देवस्थान आहे याची प्रचिती सर्वांनाच आहे. वर्धापन दिनानिमित्त मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 18 मे रोजी कारीवडे गावासाठी डोळे तपासणी शिबिर व आरोग्य शिबिर याचेही आयोजन करण्यात आले होते. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी व सिद्ध महापुरुष सेवा मंडळ कारीवडे- गोसावीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता. या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर अमृता स्वार, डॉक्टर नेत्रा सावंत, डॉक्टर सचिन हरमलकर यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरामध्ये 50 ते 60 स्त्री पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला . इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.दर्शना रासम, पूजा पोकळे, मंडळाचे अध्यक्ष बाबनाथ गोसावी, सुधीर पराडकर, सिद्धेश गोसावी, सागर गोसावी तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठे सहकार्य व योगदान दिले.
मंडळाच्या वतीने 19 मे ला सायंकाळी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख अतिथी युवराज लखम राजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोसले,महालक्ष्मी सुपर मार्केटचे मालक कांता कोंडयाळ, परीक्षक सुधीर धुमे, मालवणी कवी दादा मडकईकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, डॉक्टर सचिन हरमलकर, सुधीर पराडकर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबनाथ गोसावी यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर पराडकर केले. या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू मेघनाथ कोकरे, फॅकी गोम्स यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच मालवणी कवी दादा मडकईकर यांनी आपली आपल्या मालवणी कवितेने सर्वांना आनंदीत केले त्यांचाही सत्कार करण्यात आला . तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, युवराज लखमराजे व माजी नगरसेवक सुरेश भोकटे यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाचे अध्यक्ष बाबनाथ गोसावी व त्यांची पत्नी सौ. दीपा गोसावी यांचाही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय धावपटू मेघनाथ कोकरे व फॅकी गोम्स व महालक्ष्मी तथास्तु शॉपिंग मॉल चे मालक कांता कोंड्याळ यांचाही सत्कार करण्यात आला माझी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मंडळाच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले तसेच रोजगार संदर्भात मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे लखम राजे यांनी आताच्या युगामध्ये कम्प्युटर क्षेत्रामध्ये प्रगती करणे किती महत्त्वाचे आहे याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. तसेच टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस विकसित होत आहे यातही युवा पिढीने लक्ष देऊन आपलं करिअर करावं या दृष्टीने मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधीर पराडकर यांनी केले. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मंडळाच्या वतीने दशावतारी नाटकाचेही आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी पार पडला.









