प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयात तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पेडणे तालुका बहुजन समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर आणि समाज कार्यकर्ते सूर्यकांत चोडणकर यांनी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच सरकारी अधिकाऱयांचा निषेध करण्यासाठी आज दीपावलीच्या पूर्वसंध्येला पेडणे बाजारपेठेत खड्डय़ात मेणबत्या लावून निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना उमेश तळलणेकर म्हणाले की पेडणेत रस्ता खड्डेमय झाल्याने आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे अपघातात होऊन अनेक जणांचे मृत्यू झालेले आहेत. एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर तोसे येथे रस्ता योग्य तऱहेने कंत्राटदराने न बनवल्याने या रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे आई आणि त्याचे लहान बालक यांचा अपघातात मृत्यू झाला. तर काल मांदे येथे रस्ता खोदल्यामुळे रस्ता चिखलमय होऊन दुचाकी आणि ट्रक याच्यात झालेल्या अपघातत एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. या सरकारला याची जाण नसून सरकार आणि रस्ता विभागाचे आधिकारी यांचा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. जे मृत झालेल्या आहेत त्यांच्या आत्म्याला यानिमित्ताने आम्ही शांती मिळावी अशी प्रार्थना करतो तसेच जे अधिकारी आहेत त्यांना दिवाळीच्या निमित्ताने जाग यावी तसेच सरकारला जाग यावी यासाठी मेणबत्ती या खड्डय़ात आम्ही लावून सरकारचा निषेध आणि लक्षवेध देण्याचं काम आम्ही करत आहोत. यापुढे सरकारने हे रस्त्यात पडलेले खड्डे तातडीने दुरुस्ती करावे अशी मागणी यावेळी उमेश तळवणेकर यांनी केली.
यावेळी बोलताना समाजकार्यकर्ते सूर्यकांत चोडणकर म्हणाले की पेडणे बाजारपेठ तसेच पेडणे बाजारपेठ ते नईबाग पर्यंतचा रस्ता हा खड्डेमय बनला आहे .या रस्त्यातून दुचाकीवरून गेल्यास त्याचा प्रत्यय येतो. आणि या रस्त्याची जी बिकट परिस्थिती आहे त्यावर पेडण्याचे रस्ते विभाग अधिकारी कोणत्याच प्रकारची उपाय करत नाहीत. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले .आणि या अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडले. आता तरी सरकारने डोळे उघडून या रस्त्यावरचे खड्डे बुजवावे अशी मागणी सूर्यकांत चोडणकर यांनी केली.









