वाकरे प्रतिनिधी
कोपार्डे (ता. करवीर) येथील स.ब.खाडे महाविद्यालयात दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांची ७९ वी जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी सर्व प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सदभावना रॅली काढली.प्रभारी प्राचार्य डॉ.एस.बी.राऊत यांनी प्रतिमापूजन केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एस.पी.चौगले यांनी प्रास्ताविक व सदभावना प्रतिज्ञा दिली.आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.डी.बी.माने यांनी मानले.यावेळी सर्व सेवक,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,विद्यार्थी उपस्थित होते.









