खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीच्या कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. 1 नोव्हेंबर 2023 रोजी काळादिन गांभीर्याने पाळावा, यासाठी बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी हजर रहावे यासाठी गर्लगुंजी, जांबोटी, लोंढा, नंदगड, खानापूर जागृती दौरा करण्याचे ठरविले. प्रास्ताविक आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, सीमासत्याग्रही फकिरा सावंत, नारायण लाड, संजीव पाटील, पांडुरंग सावंत, जयराम देसाई, कृष्णा कुंभार, रमेश धबाले, डी. एम. भोसले, अजित पाटील, रमेश देसाई, जगन्नाथ देसाई, जयवंत पाटील यांनी आपले विचार मांडले. 1 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती स्मारक येथील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात लाक्षणिक उपोषण सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करून धरणे आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. आभार शंकर गावडा यांनी मानले.









