वाहतूक कोंडी, मनपाने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयापासून कचेरी रोडवर भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. सोमवारी या रस्त्यावर बरीच जनावरे ठाण मांडून बसल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी झाली. तेव्हा तातडीने या भटक्या जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी जनावरे वावरताना दिसत आहेत. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली रस्त्यावरच ही जनावरे ठाण मांडून बसली होती. त्यामुळे वाहनचालकांना ये-जा करणे कठीण झाले होते. अशाप्रकारे वारंवार रस्त्यावरच ही भटकी जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर लहान-मोठे अपघातही घडत आहेत. तेव्हा तातडीने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









