आपल्या वाढदिवासाचे औचित्यसाधून कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिली भेट आहे. पंतप्रधानांच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना म्हैसूर फेटा, शाल आणि म्हैसूर दसरा अंबारीचे स्मृतीचिन्ह त्यांना भेटी दाखल दिल्या. पंतप्रधानांनी सिद्धरामय्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सिद्धरामय्या यांनी राज्याच्या विकासासाठी अनुदान मंजूर करण्यासंबंधी काहीकाळ चर्चा केली.

त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, रक्षा मंत्री राजनाथसिंग यांचीही भेट घेतली. मंत्री राजनाथ सिंग यांना यंदा होणाऱ्या म्हैसूर दसरादरम्यान एअर शो ची अनुमती मागितली.









