प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा अभिवृद्धी संघ यांच्यावतीने पहिल्यांदाच अनगोळ ते पंढरपूर अशा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाथ पै नगर येथून या दिंडीला सुरुवात करण्यात आली.
हभप श्री सद्गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज, हभप श्री पुरुषोत्तम गिंडे महाराज यांच्या व हभप श्री कृष्णमूर्ती सुखदेव अप्पा बोंगाळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याला चालना देण्यात आली. दिंडीच्या प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थान व म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, कार्यकर्ते उमेश कुऱ्याळकर, परशराम तासिलदार यांच्या हस्ते दिंडीच्या वाहनांचे श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले.
यावेळी राजू पवार, माजी महापौर शोभा सोमणाचे, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे व महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिंडी राजहंस गल्ली येथील श्री सद्गुरु सदानंद महाराज मठ येथे पोहोचताच श्रीराम युवक मंडळाच्यावतीने अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. यानंतर धर्मवीर संभाजी चौकातून दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले









