वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असून मंगळवार दि. 13 रोजी सांबरा ग्रामस्थांतर्फे सवाद्य मिरवणुकीने जाऊन श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली. तत्पूर्वी गावातील वेशीतून सवाद्य मिरवणुकीने श्री महालक्ष्मी देवीच्या गदगेपर्यंत जाण्यात आले. यावेळी सांबरा ग्रामस्थांचे श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीने भव्य स्वागत केले. त्यानंतर सांबरा ग्रामस्थांच्या वतीने श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी सांबरा येथील देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी बसरीकट्टी येथील यात्रेची सर्व तयारी पाहून यात्रा कमिटीची व ग्रामस्थांची प्रशंसा केली. यावेळी श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष विक्रम देसाईसह सदस्य उपस्थित होते.
यात्रेची आज सांगता
मंगळवार दि. 13 पासून सुरू झालेल्या येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची बुधवार दि. 21 रोजी सांगता होणार आहे.









