ओटवणे प्रतिनिधी
On behalf of Indian Dalit Federation Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebration!
भारतीय दलित महासंघाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व बहुजन, वंचित, पिडित स्त्री, पुरुष, धर्म, जातीसाठी महान कार्य केले असून याचे भान सर्वांनी ठेवण्याचे आवाहन केले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी भारतीय दलित महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष विष्णू जाधव, जिल्हा सल्लागार नामदेव परब, तालुका खजिनदार भगवान तारी, सावंतवाडी सल्लागार एकनाथ परब, रोहन जाधव, गणेश उर्फ राज जाधव, सतिश जाधव, चंदन जाधव, पांडुरंग जाधव, मोरेश्वर जाधव, कांचन जाधव, सविता जाधव, भक्ती जाधव, प्रभावती तारी, दिपाली जाधव, गणेश जाधव, कृष्णा जाधव, एकनाथ जाधव, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक जाधव यांनी सूत्रसंचालन नामदेव परब यांनी तर आभार विष्णू जाधव यांनी मानले.









