मुंगूल गँगवॉरप्रकरण : आतापर्यंत 23 जणांना अटक
मडगाव : गेल्या काही दिवसापूर्वी मुंगूल येथे घडलेल्या गँगवॉरचे धागेदोरे आता राजस्थानमध्येही पोचलेले असून फातोर्डा पोलिसांनी राजस्थानला जाऊन ओमसा या नावाने ओळखत असलेल्या ओम प्रकाश राम या 30 वर्षीय संशयिताला तसेच सूरज नाईक बोरकर याला गोव्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला संशयित हा बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे समजले असले तरी याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून त्यास दुजोरा मिळू शकला नाही. याच हिसेंसंदर्भात फातोर्डा पोलिसानी सूरज नाईक बोरकर यालाही अटक केली आहे. त्यामुळे मुंगूल गँगवॉरप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांचा आकडा 23 वर पोचला आहे.मुंगूल प्रकरणी गोळीबार का करण्यात आला किंवा या प्रकरणामागील हेतू फक्त आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी दोन गॅगचा हा प्रयत्न आहे की अमली पदार्थाचे गोव्यातील जाळे याच माध्यमातून पसरलेले आहे याचा सध्या तपास, पोलिस करीत आहे. या हिंसेसंबंधी तपास यंत्रणेने सुरुवातीला तपास करुन संशयित आरापीना अटकही करण्यात आलेली असली तरी न्यायालयात या प्रकरणातील संशयित दोषी होईल त्या दृष्टीने या तपासाची, दिशा असेल का हे आता फक्त काळच ठरविणार आहे.









