ओंकारला पाहण्यासाठी होणारी गर्दी देणार दुर्घटनेला आमंत्रण
मयुर चराटकर
बांदा
रविवारी सकाळी व्हाया तेरेखोल वाफोलीमध्ये गेलेला ओंकार हत्ती सोमवारी पहाटे पुन्हा इन्सुलीत दाखल झाला. इन्सुली धुरीवाडी येथे नदी पार करत तो पुन्हा इन्सुली मध्ये आला. येथील गावडेवाडी, वलाटी मधील भातशेती पार करत ओंकार सावंतटेंब मधील सुहास राणे यांच्या घरानजिक स्थिरावला होता. वनविभागाला याची माहिती मिळताच सर्व पथकांनी त्याचा ताबा घेतला. आता तो इन्सुली धुरीवाडी येथे असुन वनविभाग त्याला पुन्हा नदीच्या दिशेने नेत आहे. हत्ती बघायला होणारी गर्दी पाहता मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. परिसरातील गावामधून हत्ती बघायला ग्रामस्थ गर्दी करत असुन त्याला आवर घालण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.









