वनविभागाच्या तीन कर्मचाऱ्यांनी नदीत उडी घेत केले हत्तीला नदीपार
प्रतिनिधी
बांदा
शनिवारी सायंकाळी इन्सुलीत दाखल झालेला ओंकार हत्ती आज सकाळी अकराच्या सुमारास तेरेखोल नदी ओलांडून वाफोलीत दाखल झाला. येथील लिंगेश्वर मंदिर धुरीवाडी येथील नदीपात्रात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफिने त्याला पाण्यात उतरवले. वनविभागाचे वनपाल पुथ्वीराज प्रताप,वनरक्षक रिद्धेश तेली व निलेश मोर्ये यांनी नदीत उडी टाकून त्याला नदी ओलांडून जाण्यासाठी मार्ग दाखविला वनविभाग व पोलिसांच्या टीमने त्याला नदीपार करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.









