वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत वेबसाईटनुसार ओमानने आशिया कपमध्ये पहिल्यांदाच सहभागी होण्यासाठी नवीन लूक असलेला संघ जाहीर केलाआहे.
अनुभवी सलामीवीर जतिंदर सिंग आठ संघाच्या स्पर्धेत ओमानचे नेतृत्व करेल. या संघाला पाकिस्तान, यजमान यूएई आणि भारतासह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. 17 सदस्यीय संघात गेल्या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात सहभागी झालेल्या खेळाडूंपेक्षा वेगळ्या खेळाडूंचा समावेश आहे. ज्यामध्ये एकूण चार नवीन चेहरे आहेत. सुफयान युसूफ, जिकरिया इस्लाम, फैसल शाह आणि नदीम खान त्यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी आशिया कपमध्ये ओमानचा हा पहिलाच सहभाग असेल आणि संघ काय साध्य करु शकतो हे पाहण्यासाठी मुख्य प्रशिक्षक दुलीप मेंडिस उत्सुक आहेत. ओमानचा संघ आशिया कपमध्ये अनुभव आणि तरुणाईच्या मिश्रणासह प्रवेश करतो. जो आशियाती0ल क्रिकेटमधील पॉवरहाऊसविरुद्ध छाप सोडण्याचा दृढनिश्चय करतो. या स्पर्धेत केवळ त्यांच्या कौशल्यांचीच नव्हे तर खेळातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या मानसिक कणखरतेची चाचणी घेतली जाईल, असे ते म्हणाले.
ओमान संघ: जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदरा, आमिर कमील, मोहम्मद नदीम, सुफयान मेहमूद, आर्यन बिस्त, करण सोनावळे, जिकरिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मुहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.









