वृत्तसंस्था / मुल्तान
सोमवारपासून येथे यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या क्रिकेट कसोटीला प्रारंभ होत आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा नियमीत कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने त्याच्या जागी ओली पॉपकडे कर्णधाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये स्टोक्सला स्नायु दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तो या मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. या मालिकेसाठी इंग्लंड संघात नवोदित वेगवान गोलंदाज ब्रेनडॉन कार्सेचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी 15 ऑक्टोबरपासून मुल्तानमध्ये तर तिसरी कसोटी 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान रावळपिंडी येथे होणार आहे.









