वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
व्हीनस विल्यम्स व्यावसायिक टेनिसमध्ये टूर-लेव्हल एकेरी सामना जिंकणारी दुसरी सर्वात वयस्कर महिला बनली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी डीसी ओपनमध्ये fितच्यापेक्षा 22 वर्षांनी ज्युनियर असलेल्या पेटन स्टर्न्सला 6-3, 6-4 असे हरविताना तिच्या परिचित फटक्यांचे दर्शन घडविले.
मार्टिना नवरातिलोवा ही विल्यम्सपेक्षा वयाने मोठी असलेली एकमेव महिला आहे जिने एकेरी सामना जिंकला होता. टूर-लेव्हल सामना जिंकणारी एकमेव वयाने मौठी महिला मार्टिना नवरातिलोवा होती. तिने शेवटचा विजय 2004 मध्ये 47 व्या वर्षी मिळविला होता. माजी अग्रमानांकित असलेल्या विल्यम्सने मार्च 2024 मध्ये मियामीमध्ये झालेल्या अधिकृत सामन्यात शेवटचा एकेरी सामना खेळला होता. ऑगस्ट 2023 मध्ये सिनसिनाटीमध्ये तिने एकेरीमध्ये विजय मिळवला नव्हता. या आठवड्यापर्यंत तिला डब्ल्यूटीए टूरने निष्क्रिय म्हणून सुचीबद्ध केले होते. पेटन स्टर्न्सच्या जन्मापूर्वी व्हीनस विल्यम्सने चार ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली होती.









