कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 1 कोटी, ज्येष्ठांच्या आरोग्य तपासणीसाठी 25 लाख
बेळगाव : महापालिकेच्या 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात मोजक्मयाच तरतुदी नव्याने करून विशेषत: जुन्याच योजना राबविण्याच्या दृष्टीने निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प मागील पानावरून पुढच्या पानावर असल्याच्या प्रतिक्रिया नगरसेवकांनी व्यक्त केल्या. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच महापौर शोभा सोमनाचे यांनी घिसाडघाईने अर्थसंकल्प मंजूर केल्याने नाराजी व्यक्त केली. महापालिकेची अर्थसंकल्पीय बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. एरव्ही महसूल स्थायी समितीचे अध्यक्ष अर्थसंकल्प मांडतात. मात्र स्थायी समितीची निवड प्रक्रिया झाली नसल्याने महापौरांनी तोडक्मयामोडक्मया कानडी भाषेतून अर्थसंकल्प बैठकीची सुऊवात केली. उर्वरित अर्थसंकल्पाची माहिती महापालिका आयुक्त ऊद्रेश घाळी यांनी दिली. महापालिका अर्थसंकल्पात विशेषत: जुन्या योजनांचीच तरतूद अधिक केल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थसंकल्पात बसस्थानकाच्या विकासासह ई-टॉयलेटसाठी 25 कोटी आणि इतर विकासकामे राबविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
48,415.57 लाख महसूल जमा होणार असून 48,409.75 लाख ऊपये खर्च केला जाणार असून 5.82 लाख शिल्लकी अंदाजपत्रक मांडण्यात आले. विशेषत: महापालिकेच्या सभागृहातील पहिल्या बैठकीत शहरातील भटक्मया कुत्र्यांच्या समस्येबाबत जोरदार चर्चा झाली होती. शहरातील नागरिकांवर भटकी कुत्री हल्ला करीत असल्याने बंदोबस्त कोण करणार आणि ऊग्णांच्या उपचाराची जबाबदारी कोण घेणार? असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी 25 लाख, शववाहिका खरेदीसाठी 15 लाख आणि जेट सकिंग मशीन खरेदी करण्यासाठी 25 लाख ऊपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच वॉर्ड बजेटअंतर्गत 59 वॉर्डांमध्ये लोकोपयोगी विकासकामे राबविण्यासाठी 9 कोटी 50 लाख ऊपये निधीची तरतूद केली आहे. अमृत योजनेंतर्गत 25 कोटी 10 लाख ऊपये निधी मंजूर होणार असून त्याअंतर्गत 20 कोटीची तरतूद शहरातील तलावांच्या पुनर्रज्जीवनासाठी आणि उद्यानाच्या विकासासाठी 5 कोटीचा निधी खर्च केला जाणार आहे. अशा विविध नव्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी नगरसेवकांची बैठक घेऊन विविध तरतुदी करण्याची सूचना नगरसेवकांनी केल्या होत्या. मात्र या सूचनांची दखल घेतली नाही. नगरसेवकांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प तयार करण्यात यावा, असा निर्णयदेखील मागील बैठकीत घेण्यात आला होता. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेताच महापौरांनी अर्थसंकल्प मांडल्याची टीका नगरसेवकांनी केली. तर नगरसेवकांना विश्वासात का घेतले नाही? तसेच नगरसेवकांनी केलेल्या सूचनांची तरतूद यामध्ये का केली नाही? असा मुद्दा अर्थसंकल्पीय बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. तसेच 2022-23 च्या अर्थसंकल्पाची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, अशी सूचनादेखील केली होती. याबाबत महापौरांनी कोणतीच माहिती दिली नाही. याबद्दल विरोधी गटाचे नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, मुजमिल डोणी, अजिम पटवेगार, बाबाजान मतवाले आदींनी बैठकीत महापौरांकडे विचारणा केली. आपली तब्येत व्यवस्थित नसल्याने बैठक आयोजित केली नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तर महापौरांना काय उत्तर द्यावे, हेच समजले नाही. महापालिका आयुक्त, उपमहापौर, कौन्सिल सेव्रेटरी आणि अन्य नगरसेवकांच्या सूचनेनुसार महापौरांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करून हा अर्थसंकल्प मंजूर झाल्याची घोषणा केली. तसेच बैठक आटोपती घेऊन काढतापाय घेतला. वास्तविक पाहता अर्थसंकल्प मांडल्यानंतर प्रत्येक नगरसेवकांच्या मताची नोंद घेतली जाते. त्यांच्या सूचना जाणून घेऊन त्याबाबतची नोंद इतिवृत्तात केली जाते. मात्र नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताच महापौरांनी ही बैठक आटोपती घेतली. त्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.









