Uddhav Thackeray : केंद्राची महाशक्ती असलेलं सरकार असल्यावर ओझं पेलायला काय हरकत आहे असा सवाल जुन्या पेन्शनवरून उध्दव ठाकरेंनी केला. यंदाचा अर्थसंकल्प हा पंचामृताचा आहे. त्यातील काही थेंब या कर्मचाऱ्यांच्यावर उडवा असे ही ते म्हणाले.जुन्या पेन्शनवरून आणि शेतकऱ्यांच्या मोर्चावरून उध्दव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्यांना झिडकारणं योग्य नव्हे.कंत्राटी भरती खासगी कंपन्यांकडून होत आहेत हे योग्य नाही. पंचामृत म्हणजे नेमक काय समजायचं पुजेला हातावर ठेवतात ते पंचामृत का? म्हणजे धड कोणाचं पोट ही भरू द्यायचं नाही.पंचामृत म्हणजे कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही असाचं याचा अर्थ आहे. तुमच्या हातात जेवढ पडेल ते गोड माना आणि नंतर डोक्यावरून हात फिरवा असाच आहे. असा हा विचित्र अर्थसंकल्प मांडण्यात आला. यातील काही थेंब या कर्मचाऱ्यांवर उडवायला काहीच हरकत नाही असेही ते म्हणाले.
सरकार येतं आणि जातं. पण व्यवस्था कायमस्वरुपी असते. सरकार चालवण्यासाठी या व्यवस्था उपयोगी पडत असतात. त्यांनाच सरकार झिडकारत आहे.यंत्रणा मोडून काढायची, स्वत:चं आसण स्थिर ठेवायचं,देश आणि राज्य अस्थिर करायचं, हा त्यांचा कुटिल डाव आहे.टेक्साईल कमीशनच ऑफिस दिल्लीला घेऊन जात आहेत अशी माहिती समोर आली आहे. एसीबीच कार्यालय देखील दिल्लीत नेलं. एकंदरच काय तर गुलामगिरी स्विकारायची असेच त्यांचे धोरण आहे. नाशकातू शेतकऱ्यांना एवढ्या लांब चालत यावं लागतय ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









