शिक्षक आणि सरकारी कर्मचार्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ते विधान परिषद निवडणुकीपूर्वी आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यात संबोधित करताना बोलत होते. राज्याचा शिक्षण विभाग या योजनेचा अभ्यास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले ,”शिक्षक आणि सरकारी कर्मचारी, विनाअनुदानित शाळा, तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षणासाठी सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असून राज्यातील शिक्षण विभाग जुन्या पेन्शन योजनेचा काळजीपुर्वक अभ्यास करत आहे.” असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, यापुर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 1.10 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना परत लागू केली जाणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर सुमारे महिनाभरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान आले आहे.
Previous Articleसाताऱ्याला आणखी एक दत्ता जाधव परवडणार नाही
Next Article मुख्याधिकाऱ्यांच्या रजेमुळे ठेकेदार वैतागले








