बेळगाव : दैव बलवत्तर म्हणून जीव बचल्याची घटना शुक्रवारी बेळगाव रेल्वेस्थानकात घडली. म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस पकडताना पाय घसरल्याने एक 55 वर्षीय वृद्ध रेल्वेसोबत फरफटत पुढे गेला. त्या ठिकाणी असलेल्या आरपीएफ जवानाने तात्काळ उडी मारून त्या वृद्धाला बाहेर खेचत प्राण वाचविले. त्या ठिकाणी जर तो जवान नसता तर मोठा अनर्थ घडला असता. बसुर्ते (उचगाव) येथील भरमा कुंभार हे आपल्या नातवासोबत बेळगाव ते पुणे असा प्रवास करणार होते. रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दरम्यान त्यांचा पाय रेल्वेमध्ये अडकल्याने ते फरफटत रेल्वेसोबत पुढे गेले. याच दरम्यान आरपीएफ जवान सी. आय. कोप्पद यांनी हा प्रसंग पाहताच तात्काळ रेल्वेकडे धाव घेतली. त्या वृद्धाला ओढून रेल्वेपासून दूर केले. दोघेही रेल्वेच्या झोतामुळे प्लॅटफॉर्मवर कोसळले. सुदैवाने त्या वृद्धाचा जीव वाचला. किरकोळ दुखापत वगळता कोणतीही गंभीर इजा झाली नाही. कुंभार कुटुंबीयांनी त्या आरपीएफ जवानाचे आभार मानले. ही संपूर्ण घटना रेल्वेस्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तो व्हिडिओ रविवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. आरपीएफ जवानाच्या धाडसाचे सध्या कौतुक होत आहे.
Previous Articleसुळेभावी येथील चोरी प्रकरणी नात्यातील अल्पवयीनाला अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









